असावा एक छंद चुका शोधायचा आणि सुधारायचा

बहुतेक लोक आयुष्यात एक मोठी चूक करतात—ते स्वतःच्या चुका लपवण्यात जास्त वेळ घालवतात, पण त्या सुधारण्यात कमी. चूक होणे ही समस्या नाही. तीच चूक पुन्हा पुन्हा होणे ही खरी समस्या आहे. यशस्वी आणि अयशस्वी व्यक्तीमधला सर्वात मोठा फरक बुद्धिमत्तेत नसतो; तो स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहण्याच्या वृत्तीत असतो.

यशस्वी माणूस स्वतःला एक प्रश्न विचारतो—“माझी चूक कुठे झाली?” तर अपयशी माणूस सांगतो— “माझ्यामुळे नाही, इतरांमुळे असे झाले.” जोपर्यंत आपण प्रत्येक अपयशासाठी परिस्थिती, नशीब किंवा इतरांना दोष देत राहतो, तोपर्यंत बदलाची सुरुवात होत नाही. कारण ज्यावर आपले नियंत्रण नाही, ते आपण बदलू शकत नाही. पण स्वतःला आपण इच्छा असल्यास कधीही बदलू शकतो.

स्वतःच्या चुका शोधणे म्हणजे स्वतःला कमी लेखणे नाही

– The Growth Lab
blog1

चूक मान्य करण्याची ताकद

“माझ्यामुळे नाही, इतरांमुळे असे झाले.” –

स्वतःच्या चुका शोधणे म्हणजे स्वतःला कमी लेखणे नाही. उलट, ती स्वतःला अधिक सक्षम बनवण्याची प्रक्रिया आहे.आरसा आपण जसे आहोत तो चेहरा दाखवतो. तो चेहरा आपल्याला आवडला नाही तर आपण त्याचा राग करत नाही; त्याचप्रमाणे आपल्या चुका दाखवणारा अनुभवही आपला शत्रू नसतो, तर तो आपला शिक्षक असतो.लहान चुका वेळेवर सुधारल्या, तर त्या मोठ्या समस्यांमध्ये बदलत नाहीत.दररोज फक्त एक टक्का सुधारणा केली, तरी वर्षभरात आयुष्यात मोठा बदल घडू शकतो. चूक मान्य करण्याची ताकद लक्षात ठेवा, चुका करणारा माणूस पुढे जाऊ शकतो.

पण स्वतःची चूक मान्य न करणारा माणूस त्याच जागी अडकून राहतो. स्वतःच्या चुका स्वीकारण्याची तयारी ही कमजोरी नसून, ती प्रगतीची पहिली पायरी आहे. आपण जेव्हा स्वतःला प्रामाणिकपणे प्रश्न विचारतो, तेव्हा आपल्याला आपल्या वर्तनातील, विचारांतील आणि निर्णयांतील चुका समजायला सुरुवात होते.

लक्षात ठेवा…

चूक लपवली तर ती सवय बनते.
चूक स्वीकारली आणि त्यात बदल केला तर ती यशाची पायरी बनते.

यासाठी करून पहा

आज दिवस संपण्यापूर्वी स्वतःला हे तीन प्रश्न विचारा:

  1. आज माझ्याकडून कोणती चूक झाली?
  2. त्या चुकीतून मी काय शिकलो?
  3. उद्या तीच चूक टाळण्यासाठी मी कोणती एक कृती करणार?

या तीन प्रश्नांची उत्तरं रोज प्रामाणिकपणे लिहिण्याची सवय लावा.

हळूहळू तुम्हाला तुमच्या चुका समजू लागतील, त्यामागची कारणं लक्षात येतील आणि त्यावर योग्य कृती करण्याची सवय लागेल.

ही छोटीशी सवय तुमचा प्रत्येक दिवस कालपेक्षा अधिक चांगला बनवू शकते.

स्वतःच्या चुका शोधण्याचा छंद लावा, कारण स्वतःमध्ये सुधारणा करण्यापेक्षा मोठी गुंतवणूक दुसरी कोणतीही नाही.

The Growth Lab

🌸 त्यांच्या शब्दांत

सौ. राजश्री महेश दुर्गे

द ग्रोथ लॅबच्या कार्यशाळांमुळे माझ्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला.
सुरुवातीला ‘स्वयं सूचना’ या कार्यशाळेत सहभागी झाले आणि त्यानंतर प्रत्येक कार्यशाळेत सहभागी होण्याची उत्सुकता निर्माण झाली.

या प्रवासातून मला माझी ध्येये, इच्छा, क्षमता आणि मेहनत यांची सांगड घालून यशाच्या दिशेने कसे पुढे जायचे हे समजले. त्याचबरोबर सुदृढ मानसिक आरोग्याचे महत्त्वही अनुभवातून जाणवले.

प्रत्येक कार्यशाळेत मला माझी एक नवीन ओळख होत गेली. सकारात्मक विचार, कृतज्ञता, आत्मविश्वास आणि शिस्त यांचा माझ्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला. आज संकटांना सामोरे जाण्याची शक्ती आणि स्वतःवर विश्वास माझ्यात निर्माण झाला आहे.

जुन्या चौकटी मोडून स्वतःची नवीन ओळख निर्माण करता आली, मन अधिक शांत, समाधानी आणि आनंदी झाले. या प्रवासात मला एक सुंदर मित्रपरिवारही मिळाला, ज्यामुळे जीवनात आपलेपणा आणि आनंद वाढला.

आज मनात एक विश्वास आहे—माझी सर्व स्वप्ने पूर्ण होणारच आहेत!”

🙏 खूप खूप धन्यवाद नवनाथ सर आणि द ग्रोथ लॅब.

— सौ. राजश्री महेश दुर्गे



whatsapp image 2026 08 22 at 8.36.49 pm

1 thought on “असावा एक छंद चुका शोधायचा आणि सुधारायचा”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *